खरच आम्हाला छत्रपती शिवराय कळाले असते तर किती बर झाल असत ना ? आज महाराष्ट्रात कोणत्याच स्त्री वर अत्याचार झाला नसता... आमच्या शेतकरी राजा ने आत्महत्या नाही केल्या असत्या.. कुणाचेच आई बाप वृध्दाश्रमापर्यंत पोहचले नसते.. जात पात जातीवादाच्या नावावर भांडण उभी राहिली नसती... खरच आम्हाला छत्रपति शिवराय कळाले असते तर ? पण आमचं नशीब कुठे एवढ मोठ की आम्ही शिवरायांचा आदर्श आणि त्यांच्या विचारांना आचरणात आणू शकतो माफ करा राजे आम्हाला 350 वर्षापुवी जे आमचं भविष्य तुम्ही जाणल होत जो इतिहास तुम्ही घडवला होता नाही कळालं आम्हाला... तसेही, तुम्ही आम्हाला कोणाला समजलाच नाही, आणि आमची तुम्हाला समजून घेण्याची तेवढी लायकी आणि बुद्धीमत्ता पण नाही. एक मात्र आम्ही नक्कीच करत राहू, आम्ही सर्व जण मिळून तुमच्या "जयंतीला आणि तुमच्या राज्याभिषेकादिवशीच" रॅली काढू, भगवे झेंडे घेवून दारूच्या नशेत तुमच्या समोर नाचू आमची नावं मोठ करण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करू तुमचं नाव घेवून जातीचं राजकारण करू हे मात्र नक्की करू शकतो आम्ही.... 🌹 जय भवानी जय शिवराय🌹
I
Ishaan Mehta
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
117 likes
60 shares