खरंच ग नाही आठवणार तुला ते दिवस , आपल्या बालपणीचे , आपल्या त्या निर्मळ भेटीचे , नाही ग आठवणार तुला ,, सकाळी उठल्या वर मला शोधत आणि मी तुला , बघायला येणं आपल्या दिवसाची सुरूवात नाही आठवणार तुला ,,, नंतर आपलं बोलणं , नजरेआड काहीतरी तोंडात बडबडणं , काय बोलं म्हणून विचारल्यावर गालातल्या गालात हसणं , नाही आठवणार तुला ,,, एक दिवस भेटलो नाही , दिसलो नाही की , धडपड होणे , भेटल्यावर मग एकमेकांना विचारणे कुठं होता , कुठं होती , हे प्रश्न चालू होणे , नाही आठवणार तुला , असं खूप काही आहे ग आठवण्यासारखं पण तुला नाही आठवणार , पण जेव्हा आठवेल ना तेव्हा तु मला भेटायला अतुर होशील , सैरावर होशील , पण वेळ आणि नशीब तेव्हा बदलेले असेल , कारण तेव्हा तु मला बोलली तरी , मी तुझा संसार मोडू पाहणार नाही , तू सुखी राहावी हीच इच्छा आहे , माझं विरह , माझं प्रेम , माझं माझ्या जवळच ठेवण , आणि जगल ही तुझ्यावीना , तुझ्या आठवणी त !!! पण तुला जुनं सर्व एक दिवस आठवेल...
0 likes
0 shares