Back to feed
A
Anaya Pawar Life · Marathi · Life

गीत व्हावे एक ऐसे अंतराला स्पर्शणारे , नाद बिंदू वेचताना अनंताशी पोचणारे । या जीवाच्या घालमेली त्या जीवाला सांगणारे, दुख वेदनान्तुनी फुलुनी विश्व सारे गंधणारे । वेचीताना सूर सुमने, फुल पानी जागणारे, लाजणाऱ्या मुग्ध कलिका, चंद्र बिंदू चुंबणारे । गंधवारा वाहताना तरु - लताना वेढणारे, थाप पडता कडकडाती रंध्र रंध्री धुंदणारे । अंधारल्या मनातुनी , एक पणती लावणारे, दोन हृदये सांधताना , हात हाती गुंफणारे । सूर माझे शब्द माझे, वाट माझी चालणारे, नाद बिंदू वेचताना अनंताशी पोचणारे ।

93 likes 86 shares
WhatsApp