Back to feed
K
Kunal Mishra Life · Marathi · Life

** *गोफणगुंडा* **** *xxxx* *काळंधन हाकलं, हाकलुन सुध्दा जाईना* *हजाराच्या नोटेला, कुञ सुध्दा खाईना* *चालतं बोलतं ऑफीस* *पैशावर चालायचं.* *पाचशेच्या नोटेवर* *पांढरं हत्ती झुलायचं* *खालुन नोटा वरुन नोटा* *फाईली वर खेळायाच्या.* *मोठ्या नोटा पाहुन* *गादीवर लोळायच्या* *लालहिरवी कुठलीच. नोट अाज येईना* *हजाराच्या नोटेला, कुञ सुध्दा खाईना* *ढाबा अाणि बार* *एका राञी गार.* *बाटलीच्या धुंदित* *ग्लास खाई मार* *चिडीचुप मालक* *पुतळ्यासारखा बसला.* *गल्याकडे पाहुन* *अाचारीही हसला* *शंभराची नोट घेवुन.गिर्‍हीक कसं *येईना हजाराच्या नोटेला, कुञ सुध्दा खाईना* *छाटछुट भुरटे नेते* *भारी राव तापले.* *काळे धंदे उद्योगपती* *नोटाअाड लपले* *सर्जिकल स्ट्राईकने* *कंबर झाली ढिली.* *बातमी वाचुन सकाळी* *पॅन्ट झाली ओली* *छातीमधली कळ.गोळ्या खावून जाईना* *हजाराच्या नोटेला, कुञ सुध्दा खाईना* *कटिंग करता करता* *न्हावी सुध्दा बोलेना.* *शंभर दावल्या खेरिज* *काञी सुध्दा चालेना* *ढोलकीवर ताल धरता* *लवंगी मिरची झोंबली.* *गिरकी घेवुन नाचणारी* *लावणी सुध्दा थांबली* *पाचशेच्या नोटेवर, गजरा सुध्दा येईना* *हजाराच्या नोटेला, कुञ सुध्दा खाईना* *बायको सदा म्हणायची* *करा खर्च बांधा माडी.* *हजारवेळा बिचारीनं* *मागितली होती साडी* *चिकन बिकन खावुन* *सुधरा तुम्ही बाॅडी.* *नोटा गोळा करण्यातच* *वाढत राहीली दाढी* *पाचशेची नोट, जाईल म्हणता जाईना* *हजाराच्या नोटेला, कुञ सुध्दा खाईना*

139 likes 28 shares
WhatsApp