गुरू कृपा होता ।देह देवतुल्य झाला। भवताप अंतरीचा ।सोडुनीया गेला। गुरुविना ग्यान असे।हे पाषाण। गुरू वाक्य प्रमाण।काळही थांबला। गुरू तारी त्याते।नाही कोणे भय। गुरुचरणी लीन त्याच साध्य। गुरू मिळे ।सकृत जन्मांतरीचे। याची जन्मचे कृत।अपुरे पडे। गुरू सांग काही ।त्यातच कल्याण। जन्माचे भुषण।याहुन दुजे काय। गुरू नाही वेलु।तो ची मुळाचा प्रारंभु। मुळाचेच ठाई ।वृक्षाचा आधारु। गुरुपौर्णिमेच्या निमित्य सर्व गुरुनां सादर दंडवत । ॥गुरु माझे स्वामी ॥🙏
30 likes
38 shares