Back to feed
M
Meera Chauhan Spiritual · Marathi · Spiritual

नीरेच्या तीरी माऊलींची वारी । नामजप मुखी श्रीहरी, श्रीहरी ।। नीरा भीवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी। अंती तो वैकुंठ प्राप्ती, ऐसे परमेष्ठि बोलिला।। या संत वचनाप्रमाणे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात नीरा नदीत स्नान झाले.. *इंद्रायणी आणि चंद्रभागा या दोन्ही नद्यांव्यतिरिक्त माऊलीचे फक्त नीरा नदीतच स्नान होते.*

224 likes 22 shares
WhatsApp