Back to feed
J
Jiya Reddy Humor · Marathi · Humor

*गावकरी:* काय रे गावच्या *याञेला येतोस* का गावी? *नोकरीवाला:* नाय ओ रजा जास्त... पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *होळीला* येतोयस का गावी? *नोकरीवाला: पोरांना सुट्टी नाय* ओ... उगीच शाळा कशाला बुडवायची.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *दसऱ्याला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:* नाय ओ *तब्येत बरी नाय*...नाय जमणार.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *दिवाळीला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:* आलो असतो.... पण ऑफिस मध्ये *एकटाच* आहे.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही? *नोकरीवाला:* *आई-बाबा आहेत* ना... ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी*: अरे त्या दिवशी *मयतावर* आलास नाही? *नोकरीवाला*: निघालो होतो... पण *ट्रॅफिक* इतकी होती की, माती भेटलीच नसती... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी*: अरे यंदा *आवणीला* येशील ना? *नोकरीवाला:* साहेबानी सांगितलय.... *रविवारी पण* कामावर यायला लागेल.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी(फोनवरुन):* अरे ऐकलस काय... *समृद्धी हायवे त गेलेल्या जमिनी नोटीस आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत,* पण सहीसाठी यायला जमेल काय तुला, दादा पण यायला निघालाय? *नोकरीवाला:* दहा मिनिटांत ऑफिस मधून निघतो, एकटाच आलो तरी चालेल की सगळी येऊ.... *दादाला सांग दोन तासात पोहोचतो* आणि हो मोठ्या बाबांला विचार *घरी येऊ का डायरेक्ट तहसीलदार ऑफिसला येऊ....* पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो मी ???? 😭😄😂😜😅😱😇 ?😓 *विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही सत्य परिस्थिती आहे. ...* लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण,जुन्या रीती, भूतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.... जरूर विचार करा आणि बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करूया.... 👏🏻👏🏻👏🏻

98 likes 5 shares
WhatsApp