Back to feed
A
Anika Kapoor Love · Marathi · Missing

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे आठवणीने दे..... ......

0 likes 0 shares
WhatsApp