Back to feed
R
Reyansh Rao Patriotic · Marathi · Patriotic

चालू घडामोडी:- -------------------------------------- * स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला. केंद्रीय ग्रामविकास व पेयजल मंत्रालयाने घेतलेल्या स्पर्धेत ग्रामीण स्वच्छतेबाबत अग्रेसर असलेल्या पहिल्या 75 जिल्ह्यात सिंधुदुर्गासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व ठाणे या राज्यातील पाच जिल्ह्यांनी पहिल्या दहात स्थान पटकावले • राज्य म्हणून मात्र महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेबाबत मागे म्हणजे 26 पैकी 15 व्या क्रमांकावर आहे. ग्रामस्वच्छतेबाबत सिक्कीम व स्वाभाविकपणे केरळने अव्वल स्थान मिळविले • सिक्कीम व केरळ ही देशातील सर्वांत स्वच्छ राज्ये आहेत. बिहार शेवटच्या क्रमांकावर आहे. जून 2016 ची राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ राज्यांची आकडेवारी व क्रमवारी जाहीर केली. यात 2015 मध्ये 52 टक्यांच् सह 15 व्या क्रमांकावर असलेले राज्य 2016 मध्ये एका क्रमांकाने घसरून नागालॅंडच्याही खाली म्हणजे 16 व्या क्रमांकावर आले * वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेशने सरकारने मंजुरी दिली. • ई-तिकीट आरक्षित करताना जेमतेम फक्त एक रुपया जास्त भरून प्रवाशांना दहा लाख रुपयांपर्यंत विमाकवच देणारी रेल्वे प्रवासी विमा योजना प्रायोगिक तत्त्वावर अमलात आली • विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता मोफत स्मार्टफोन देण्याची घोषणा केली * केवळ पाच शहरांमध्ये ई-रिक्षांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देणाऱ्या राज्य सरकारने आता मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात या रिक्षांना परवानगी दिली • भारतीय रिझर्व्ह बँकेने(आरबीआय) आर्थिक सर्वसमावेशकतेच्या मार्गात अडथळा येऊ नये यासाठी इस्लामिक बँक प्रणाली स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडला • पुढील ऑलिंपिक २०२०मध्ये जपानमध्ये होणार आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी निर्माण केली जाणारी पदके खाणीतील धातूपासून नव्हे; तर थेट ई-कचऱ्यातून निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. * बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांना फ्रान्स सरकारने "नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर‘ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. जैवतंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला * मुंबई बंदसम्राट‘ असा दबदबा निर्माण केलेले ज्येष्ठ कामगार नेते शरद राव (वय 75) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या सांगण्यावरून मुंबई लेबर युनियनमध्ये प्रवेश केला. 1967 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर जॉर्ज दिल्लीला गेले. त्यानंतर मुंबईतील कामगार चळवळीत निर्माण झालेली पोकळी राव यांनी भरून काढली • भारतामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना "भारतीय रहिवासी" म्हणून दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला • गेली पन्नास वर्षे सातत्याने वऱ्हाडी भाषेतील कवितांच्या माध्यमातून बोलीचा प्रचार प्रसार करणारे यवतमाळ येथील ज्येष्ठ कवी शंकर बडे (68) उर्फ काका बडे यांचे निधन

227 likes 41 shares
WhatsApp