Back to feed
D
Dhruv Patel Life · Marathi · Life

चला जावू त्वरेने दुःख मोजून घेवू फक्त सांगा मोजपट्टी कोणती घेवू | सरणावरी धनी असा सुखाने निजला कपाळावर सांगा कोणता फलक लावू| इथे सुखाने रोज घास चरतो आम्ही दुःखाचा सांगा मग कोणता ढेकर देवू | उभा जन्म माझा भिजल्या मातीत गेला कोरडा फाळ सांगा जमिनीस कसा लावू | जन्म सरतो मरतो सरणावरी चढोनी कोणता सुवास सांगा मागे ठेवून जावू | धुरही इथे चंदनाचा हवेत विरून जाई वरती जाताना सांगा काय घेवून जावू | भलासा देह माझा राखेत विझून जाई कोणत्या मातीत सांगा पुन्हा जन्म घेवू |

258 likes 67 shares
WhatsApp