चला ठेवा सरणावर माझा प्रवास संपला नका आठवु मागचं... आता सरण पेटवा...! मला निरोप द्यावया लगबग करा थोडी सहन होत नाही आता अश्रु नयनांची बेडी...! थोडे चटके बसतील आयुष्य जळन्यात गेलं जीवनात दिस राती दू:ख सावरन्यात गेलं..! नका पाहू मागे पुढे शिल्लक दिसणार नाही सारे जगतील खुशीत गरज भासणार नाही...! खरं सांगा गेल्यापाठी जग थांबले का कधी पाणी जोरात वाहताना कधी थांबली का नदी..? आलो तसाच चाललो काही नाही बरोबर माझं माझं मी करत लावली होती घरघर...! आज निवांत जाहलो परिक्रमा केली पूरी जीवनाच्या चक्रातुन करा शेवटची तयारी...! काय मिळवले मी काय घालवले सांगा फक्त जोडला जगताना प्रीत ओलावनारा धागा...! सरण पेटून गेल्यावर फक्त एकच करा हो काळजाच्या कुपितला धागा मनात धरा हो...! राख सावडताना तुम्हा एक मिळेल गुपित अश्रु गाळल्या जागेत नित्य जळनारी वात.
192 likes
19 shares