*चेहरा* चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा." त्यासाठी...... माणसानं घडघड बोललं पाहिजे खळखळून हसलं पाहिजे, दिलखुलास विनोद केले पाहिजेत , मनसोक्त रडलं पाहिजे! थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे. 😊😊😊 😊😊😊
71 likes
49 shares