छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा आवाज एक मराठा लाख मराठा या गाण्यात असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यांना संपर्क करताच तात्काळ डॉ. कोल्हे यांनी होकार दिला. लेखक आजारी पडल्यामुळे लेखनही त्यांनीच केलं आणि येऊन रेकॉर्डिंग सुद्धा केलं. रेकॉर्डिंग नंतर कार्यकर्त्यांनी मानधनाचं पाकीट पुढे केलं. पण डॉक्टरांनी हात जोडले आणि म्हणाले- "दादा, "या" कामाचे पैसे घेतले तर महाराजांची भूमिका करून काय उपयोग? एक इतिहास घडतोय; माझाही खारीचा वाटा असं समजा!" कार्यकर्त्यांच्या उत्तराची वाट न पाहता डॉ. अमोल कोल्हे निघूनही गेले...... म्हणूनच ह्या शिवभक्ताला मानाचा मुजरा करावासा वाटतो . . . ! सोबत डॉ. आमोल कोल्हे रचित काव्यपंक्ती सुध्दा देतोय अवश्य वाचा . . .👇 जो म-हाराष्ट्र रा-खतो ठा-मपणे तो मराठा! मोडला तरी न वाकणारा मराठा दिल्या शब्दाला जागणारा मराठा परस्त्रीला माता मानणारा मराठा जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा देवघरात तलवार पुजणारा मराठा वेळ पडली तर तलवार परजणारा मराठा शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा मराठा माता,माती अन् मातृभूमीसाठी झटणारा मराठा शौर्याची हाक मराठा पराक्रमाची आग मराठा अन्यायावरचा राग मराठा शिवरायांचा वाघ मराठा एक मराठा लाख मराठा!!!
I
Ira Rao
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
101 likes
54 shares