Back to feed
A
Anaya Reddy Life · Marathi · Life

*जागतिक गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* आयुष्याचे *गणित* चुकले असे कधीच म्हणू नये . आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो *चिन्हांचा* वापर...! *बेरीज* *वजाबाकी*, *गुणाकार*, *भागाकार* हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि उत्तर मनासारखे येते. आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची, कुणाला केंव्हा *वजा* करायचे , कधी कुणाशी *गुणाकार* करायचा आणि *भागाकार* करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले कि *उत्तर* मना-जोगते येते..! आणि मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक,मित्र आप्तेष्ट यांना *हातचा* समजू नये , त्यांना *कंसात* घ्यावे!(👨‍👨‍👦‍👦) कंस सोडविण्याची हातोटी असली कि *गणित* कधीच चुकत नाही ........!! 😊 आपल्याला शाळेत *त्रिकोण*, *चौकोन*, *लघुकोन*, *काटकोन*, *विशालकोन* इत्यादी सर्व शिकवतात.. पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो तो कधीच शिकवला जात नाही. तो म्हणजे " *दृष्टीकोन*" आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण "सुख दुःखाचे" *accounts* कधी जमलेच नाही... जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की " *आठवण*" सोडून काहीच *balance* उरत नाही... 💐 राष्ट्रीय *गणित* दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎲➕➖➗✖✔📊📈📉❌

37 likes 75 shares
WhatsApp