Back to feed
A
Ayaan Pawar Life · Marathi · Life

जिंदगी माझी जरी बेकार होती वेदनेला केवढा आधार होती ऐकली ना हाक या बहिर्या जगाने या मुक्याची हीच बस तक्रार होती सोडवल्यावर तत्व सारे जिंकलो मी पण खरे तर तीच माझी हार होती भेट झाली ना कधी मानव्यतेशी माणसे तर भेटली चिक्कार होती ठेवले मेघास मी डोळ्यात माझ्या आसवे कुठवर मला पुरणार होती बेदखव झाली पाखरे ती जंगलाची जी खरी हकदार होती शेवटी मृत्यूच आला वाचवायाला जिँदगी तर आणखी छळणार होती

79 likes 59 shares
WhatsApp