Back to feed
I
Ishaan Deshmukh Life · Marathi · Life

जन्म सापडत नाही रातराणी गंध मनी आता उमलत नाही रंगविली स्वप्न जुनी आता आठवत नाही दूरवर नजरेत सखी दु;ख पेटलेले आतड्यात भूक अन जन्म सापडत नाही जीवनास माझे म्हणू ठेवू किंवा कोपऱ्यात गोठलेल्या वेदनेस काही समजत नाही कालचेच गाणे जरी सुख हरवले आज फुंकूनही प्राण शब्दी गीत उमटत नाही हरवल्या वाटा अन दुरावली साथ सारी भोवताली दाटे रात कुणाची सोबत नाही ध्यास जरी सराईचा पाय उचलत नाही जडावले पाय अन गाव ही दिसत नाही

67 likes 17 shares
WhatsApp