Back to feed
P
Prisha Sharma Life · Marathi · Life

जिलेबी साठी साहित्य :- १. २ वाट्या रवा २. १ वाटी मैदा ३. २ चहाचे चमचे डाळीचे पीठ ४. २ चहाचे चमचे आम्बट ताक ( ताक आम्बट असणे महत्वाचे) ५. २.५ वाट्या उकळत पाणी ६. केशर चवीप्रमाणे ७. थोडसं तेल ( मिश्रणावर घालायला ) ८. तेल किंवा साजूक तूप जिलब्या तळायला पाका साठी - १. ३ वाट्या साखर २. १.५ वाट्या पाणी ३. केशर ४. वेलची पूड कृती : - ज्या दिवशी जिलेबी करायची आहे त्याच्या आद्ल्या रात्री रवा,मैदा आणि डाळीचे पीठ चाळून घ्यावे.त्यामधे आंबट ताक आणि उकळते पाणी घालून एकजीव करून घ्यावे. ( साधारणपणे भजीच्या पीठा इतपत सैल होईल ). हे पीठ भिजवताना त्यात केशर घालावे म्हणजे जिलब्याना रंग चांगला येतो. ह्या मिश्रणावर तेलाचा थर घालून रात्रभर भिजत ठेवावे. दूस-या दिवशी सकाळी हे मिश्रण एकाच दिशेनी घोटून घ्यावे. हे मिश्रण टोमॅटो सॉसच्या बाटली मध्ये भरुन गरम तेलामध्ये किंवा साजूक तूपामध्ये जिलब्या तळून घ्याव्यात.पाकासाठी पाणी आणि साखर एकत्र उकळत ठेवावे.उकळत आल्यावर त्यात केशर आणि वेलची पूड घालावी. एकतारी पाक झाला की गॅस बन्द करावा.तळलेल्या जिलब्या पाकामधे घालाव्यात आणि बाहेर काढून घ्याव्यात.आता जिलब्या तयार आहेत. सूचना - जिलेबी तळायला तेल वापरावे. साजूक तूपामधे तळलेल्या जिलब्या जरा गार झाल्या की मऊ पडतात.जिलब्या मन्द आचेवर तळाव्यात नाहितर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते.

183 likes 25 shares
WhatsApp