*"जेवण आणी राशीचे स्वभाव"* थोडेसेच जेवण का असेना *मेष* आवडीने खाणार.. गरम, चमचमीत पदार्थांवर यांची पहिली नजर जाणार.. ।।१।। *वृषभे*ची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते.. लोणची-पापडासारखे पदार्थही अगदी चवीचवीने खाते.. ।।२।। कधी मारुनी मिटक्या, कधी नन्नाचा चाले पाढा.. *मिथुना*चे कौतुक मधाळ तर टीका कडवट काढा.. ।।३।। "अन्न हे पूर्णब्रह्म" म्हणत *कर्के*चे होते पूर्ण जेवण.. रुचकर पण थंड अन्नही हे कसे पटकन करतात सेवन? ।।४।। राजस जेवणाच्या *सिंहेचा* केवढा राजेशाही थाट.. थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी यांचे भरुन जाते ताट.. ।।५।। "कमी-जास्त नाही ना?" याची उगाच बाळगून भीती.. इतरांकडे पाहून ठरते *कन्येची* जेवायची नीती.. ।।६।। भात-भाजी-आमटीबरोबर पचतील तेवढ्याच पोळ्या.. अशा संतुलित आहारानंतर *तूळ* खाते पाचक गोळ्या.. ।।७।। काही Missing आहे का कधी कळतही नाही.. साधे नेहमीचेच जेवण पण *वृश्चिकेला* रुचत नाही.. ।।८।। कधी पटपट-झटपट जेवण तर कधी अगदीच वेळकाढू.. *धनू* काढत नाही जेवताना खोड्या पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।। ना कधी कौतुक ना कसली नकारघंटा.. गपगुमानं जेवतो *मकर* करत नाही कधी थट्टा.. ।।१०।। निश्चित वेळ जेवणाची पार्टी असो वा एखादे लग्न.. *कुंभेची* चिकित्सक वृत्ती नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।। कधी-कुठेही जमते *मीनेची* खाण्याशी गट्टी.. पोटभर खाताना घेतात "डाएट" नावाशी कट्टी.. ।।१२।। 😄😋आहे ना गंमत ! 😛😋 स्वतःची रास तपासून बघा😝😝😝
169 likes
37 shares