Back to feed
P
Prisha Reddy Life · Marathi · Life

जीवन,एका मोरपिसासारखं अनेक अणु-रेणूबंधांनी रंगवलेलं पिसारा फुलवुन नाचणार्‍या मयूरासारखे जीवन,पावसाच्या थेंबासारखं कोसळणार्‍या सरींच्या हातहात गुंफलेलं चालणार्‍या प्रेमी युगलासारखे जीवन,वाहत्या झर्‍यासारखं दुःख,यातना वेदनांना सामावलेलं खळखळत्या निर्मळ पाण्यासारखे जीवन,एका सरोवरासारखं नाती संबधांनी साचलेलं तुला मला आवडण्यासारखे जीवनं,नदीच्या काठांसारखं सुखदुःखाच्या लहरींनी वादळलेलं भोवर्‍यात अडकलेल्या नावेसारखे

15 likes 43 shares
WhatsApp