Back to feed
A
Avni Deshmukh Life · Marathi · Life

जीवनाचा सारीपाट कधी कूणा चुकला, अपेक्षांचे ओझे वाढले तर तो जीवनाला मुकला, सजवले स्वप्नांनी स्वप्नांचे क्षण, उडून जाई रंग एक एक हुरहुरते मन, कसोटीचे अण उपेक्षांचे हूंदके अपार, जगण्यासाठी का भावना होई लाचार, वाट अनामिक नजरेत भरली, तिने मात्र जगण्याची दिशा हेरली, स्वप्नांनीच केला स्वप्नांचा भंग, सारे काही संपले उरला हाच तरंग, मर्यादा हवी स्वप्नांला पण अंकुश नाही, लगाम घालता भावनेला उरण्याला अर्थ काही ? असाहा सारीपाट नित्याचाच खेळला, नकाराचा सुर त्याच कधीच मावळला,

112 likes 72 shares
WhatsApp