जसपाल भट्टि ---------------------- चालु घडामोडिंवर मार्मीक भाषा करणार्या विनोदवीराचा आज स्म्रुती दिन।। जसपाल सिंग भट्टी (मार्च ३, इ.स. १९५५ - ऑक्टोबर २५, इ.स. २०१२) हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शो व उल्टा पुल्टा ह्या दूरदर्शनवरील मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. तिरकस आणि चपखल विनोदांमुळे जसपाल भट्टी प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म तीन मार्च 1955 रोजी अमृतसरमध्ये झाला. चंडीगडच्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी विद्युत अभियंत्याची पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्यांमध्ये भाग घेतला. दूरचित्रवाणीवर कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी चंडीगडच्या "ट्रिब्युन" या दैनिकात ते व्यंगचित्रकार होते. पंजाब पोलिसांवर पंजाबी भाषेत आलेल्या "महौल ठीक है" या प्रहसनाचे ते दिग्दर्शक होते. हे प्रहसन गाजले. "फन्ना" या चित्रपटात त्यांनी जॉलीगुडसिंग ही व्यक्तिरेखा साकारली. "जिजाजी" या पंजाबी चित्रपटातही त्यांनी काम केले होते. पत्नी सविताबरोबर त्यांनी 2008 मध्ये सुरू केलेला "नाच बलिये" हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. मात्र, भट्टी यांना नाव मिळाले ते 1980 ते 1990 या काळात. दूरदर्शनवरील "उल्टा पुल्टा" आणि "फ्लॉप शो"मुळे ते प्रसिद्ध झाले. मध्यमवर्गीयांच्या अडचणी तिरकस स्वरूपात मांडणारा "फ्लॉप शो" आजही पाहावासा वाटतो. त्यांच्या पत्नी सविता यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आणि शोमध्ये पत्नीची भूमिकाही केली. हिंदी चित्रपटांतही भट्टी यांनी काम केले. सलमान खानबरोबर "जानम समझा करो" या चित्रपटात ते चमकले. चंडीगडजवळील मोहाली येथे त्यांनी "जोक फॅक्टरी" या नावाने स्टुडिओ उभारला होता आणि "मॅड आर्टस" हे ऍनिमेशन स्कूलही सुरू केले होते. जसपाल भट्टि यांना भावपुर्ण श्रद्धांजली ।।।।।
132 likes
17 shares