Back to feed
D
Dhruv Kapoor Humor · Marathi · Humor

*झोपतात कशा सर्व राशि* 😂😂😂😂 🐏तारवटल्या डोळ्यांनी, बदलत रहातो कुशी अंथरुण भर लोळत लोळत, झोपते *मेष* राशि ।। 🐃कधी इथे झोप कधी तिथे, सवय त्याची अशी, खुट्ट होता ताडकन् उठते *वृषभ* राशि ।। 😍जाडजुड गादी हवी पलंगपोस मऊ ऊशी, राजेशाही थाट, पाय - चेपून घेते, *मिथुन* राशि ।। 🦀दंगा गोंगाट असो किती झोप यांना येते कशी, शांत गाढ माळरानीही घोरते निवांत *कर्क* राशि ।। 🦁आपलेच अंथरुण पांघरुण आपलीच तीच ऊशी, सावधान पोज घेऊनच निद्रा घेते *सिंह* राशि ।। 👩दारे खिडक्या बंद करुन पुन्हा पुन्हा तपाशी, अर्धे नेत्र उघडे ठेऊन, झोपते *कन्या* राशि ।। ⚖दमला भागला जीव म्हणे कधी एकदा आडवा होशी, ब्रह्मानंदी टाळी लागून, झोपी जाते *तूळ* राशि ।। 🦂एक मच्छर भुणभूण कानी कपाळावर बसली माशी, माझ्या नशीबी झोप नाही, म्हणते नेहमी *वृश्चिक* राशि ।। 🏹रात्रि जागरण विनाकारण अॉफिसात डुलकी खुशाल घेशी, रित अशी ही उडाणटप्पू झोपली बघा *धनू* राशि ।। 🐊सगळं कसं वेळेवर जांभई दहाच्या ठोक्याशी, गजर नाही भोंगा नाही उठते वेळेत *मकर* राशि ।। 💧शिस्तीत आपण रहायचं तक्रार नाही कशाची, जिथे जसे जमेल तशी, निद्रीस्त होई *कुंभ* राशि ।। 🐟हातपाय धुवून येऊन प्रार्थना करून देवापाशी, दिनकर्माचा आढावा घेते सात्विकतेने *मीन* राशि ।। 😂😂😜😜😜 *स्वतःची रास स्वतः ओळखू शकता*

241 likes 9 shares
WhatsApp