Back to feed
M
Myra Nair Patriotic · Marathi · Patriotic

टिव्हिवाले साहेब तुम्हाला दाखवायच ते दाखवा... पण पठारभागाच रडगाणं टीव्ही वरती दाखवा जपान दाखवा,जर्मनी दाखवा ब्राझील अन इटली दाखवा पण भाव नसलेली आमची दुधाची किटली पण दाखवा.. 😔😔 मोदी दाखवा, कोट दाखवा रिज़र्व बँकेच्या नोट दाखवा पण उपाशी आमच्या जनावराचे साहेब फक्त पोट दाखवा... 😔😔😔 सिनेमा दाखवा, नाटक दाखवा हाउस फुल अशी थिएटर दाखवा पण गरीब आमच्या शेतकऱ्यांची उगळलेली खेटर दाखवा... 😔😔😔 नेते दाखवा ,खादी दाखवा नेत्यांसोबतची मादी दाखवा पण बैला विना पडलेली चाबकाची वाधी दाखवा... 😔😔😔 डान्स दाखवा ,नाच दाखवा ठेक्या वरच्या लावण्या दाखवा, पण तरमळलेल्या जनावरांना नसलेल्या छावन्या दाखवा... 😔😔😔 रामायण दाखवा, महाभारत दाखवा बायबल अन् कुरान दाखवा पण पाण्या विना पेटलेल पठार भागाच सरान दाखवा.. 😔😔😔 टिव्हिवाले साहेब तुम्हाला दाखवायचे ते दाखवा... पिश्चरची फाईट दाखवा !!! .साहेबांची ऐट दाखवा . पण टीव्हीवाले साहेब आमच्या शेतकऱ्यांची शेतात पाणी भरण्याची नाईट पण दाखवा... 😔😔😔 कवी- एक शेतकरी

230 likes 55 shares
WhatsApp