डॉ.नरेन्द्र दाभोळकर सरांची एक निर्भीड कविता ....! मुर्त्यांना पुजण्यापेक्षा, माणूसकिला पूजतो मी❗ काल्पनिक देवांना न मानता, फुले, शाहू, आंबेडकरांना वाचतो मी❗ छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗ पोथ्या, पुराणे वाचण्यापेक्षा शिवरायांना वाचतो मी❗ दगडासमोर त्या कशाला झुकू❓ जिजाई, सावित्री, रमाईपुढे नतमस्तक होतो मी❗ छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗ घामाचे पैसे दानपेटीत टाकून, भटांची घरे भरत नाही मी❗ तहानलेल्यांना पाणी, भूकेलेल्यांना अन्न देऊन, त्यांच्यातच देव शोधतो मी❗ छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗ हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई म्हणून जगण्यापेक्षा, माणूस म्हणून जगतो मी❗ धर्मातील पाखंडांना न जपता, माणूसपणालाच जपतो मी❗ छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗ कर्तुत्ववान माणसापेक्षा, दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी❗ मंत्र, होमहवन, कर्मकांड यांना पायाखाली तुडवून, मनगटावर भरवसा ठेवतो मी❗ छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗ मांजर आडवी गेली म्हणून न थांबता, थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी❗ अंधश्रद्धेला मातीत लोळवून, विज्ञानवाद स्विकारतो मी❗ छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी...
175 likes
4 shares