डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटे शब्द बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब म्हणाले-: मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी.तुम्ही सुखात रहावं म्हणून. यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं. मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो. M.A., PH.D., M.SC., D.SC., L.L.B. तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होतं, पण मी ती नाकारली. का? कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं होतं. मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो, पण नाही. माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी. मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो. महार , मांग , चांभार , सुतार, लोहार, माळी, धनगर, कुणबी, कोळी, या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो. मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला. पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी "हिंदु कोड बिल" बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार , वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले. मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC, ST,OBC, NT यांना आरक्षण दिलं. पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत.तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा. हे महारांनो , हे चांभारांनो, हे मांगानो , कुणब्यांनो, धनगरांनो एक व्हा. तुम्ही सर्वांनी एकत्र या. कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. एकत्र या .
94 likes
64 shares