Back to feed
M
Myra Iyer Love · Marathi · Missing

तो.... एकटाच बसलो होतो,सांजवेळी नदीकिनारी । चंद्र नभातला एकटा ,बोचला गं जिव्हारी ।। किती चांदण्या तिथे गं, आहेत अवती भवती । अन एक चांदणी माझी, नाहीच पण सोबती ।। ती.... मीही एकटीच येथे,तुझ्या आठवणीत रमते । चंद्रातच या आता,मी तुला रोज बघते ।। का क्षणोक्षणी तरीही, तव भास मज होतो । तो चंद्र आकाशीचा का हसूनी मज खिजवतो ।। तो .... कधी भेटही होईल , मी वाट पाहुनी हरतो । एकटाच गं कितीदा, या नदीकिनारी येतो ।। या चंद्रासमोरी आता,पुन्हा न एकटे येणे । तू आल्यावर सुखे , मिळूनी चांदण्यात फिरणे ।। ती...... काय करु सुचेना, कुठेही जीव हा रमेना । त्या चंद्रालाही आता, असे एकटीने पहावेना ।। ही तव भेटीची आस, मम मनी घेतला ध्यास । दोघे मिळूनी गं पाहू, हा चंद्र नभीचा खास ।। हा चंद्र नभीचा खास ।।

0 likes 0 shares
WhatsApp