Back to feed
K
Kiara Bhat Love · Marathi · Rain

तो क्षण तो क्षण भान हरवून गेला हरलो पण तो मला जिंकवून गेला पावसाच काय तो नेहमी येतो पण प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला चांदण्यातही आता मला तिच दिसते जणू तो चंद्र मला फसवून गेला देवळातही दुसरे काही मागावे नास्तिकाला तो श्रद्धाळ बनवून गेला मी फक्त साधा चित्रकार होतो अदृश्य रंगात मला तो रंगवून गेला शब्द सुद्धा अपुरे पडू लागले मनाला घातलेला बांध तो उसवून गेला....

0 likes 0 shares
WhatsApp