ती चालली होती, एकटीचं तिच्या वाटेने, ती चालली होती, एकटीचं तिच्या वाटेने ….. कुणाचीतरी सोबत मिळेल या वेड्या आशेने, तसा डोक्यावरचा सुर्य होताचं, तिच्या साथीला जणु तो साथ देत होता, तिच्या संथ गतीला ….. तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे, चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे, अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाऊ लागला, भर दिवसा हवेत मंद वारा वाहू लागला ….. तिच्या शांत चेह-यावर हसू उमटले, गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाचं उमगले, आतुर होऊन ती ढगाकडे पाहू लागली, पावसाच्या नुसत्या कल्पनेनेती प्रफ़ुल्लीत होऊ लागली ….. तिला वाटलं पावसाच्या अगणित सरी तिच्यावर कोसळणार, अन् मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळणार, पण तो मात्र तिला नुसतीचं, आशा दाखवून परतला ….. ढगाआड लपलेला सुर्य, गालातल्या गालात हसला, डोळयातून तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले, त्या थेंबानमूळे जणू सारे आसमंत उजळले ….. ती शुन्य नजरेने, तिच्या वाटेकडे पाहु लागली, थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली, अन् ती पुन्हा एकटीचं चालू लागली ….
257 likes
23 shares