Back to feed
N
Nikhil Sharma Love · Marathi · Missing

"तू माझ्या जवळ नाहीस..!!" •••••••••••••°••••••••••••• हे मन आज एकांतात खुप रडत आहे, तू माझ्या जवळ नाहीस हे दु:ख मला छळत आहे...!! ° कधी-कधी, तूझं ते माझ्यावर रागावणं, आणि मी रागावलो तर झटक्यात मला मनवणं...!! ती एक-एक आठवण मनाला आज सलत आहे, तू माझ्या जवळ नाहीस हे दु:ख मला छळत आहे...!! ° कधी-कधी, तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं, आणि मी "नाही" म्हणताच ते रुसुन बसनं...!! तूझा तो हट्टी स्वभाव माझ्या डोळ्यासमोर आहे, तू माझ्या जवळ नाहीस हे दु:ख मला छळत आहे...!! ° कधी-कधी, तूझं ते माझ्यासाठी वाट पाहणं, मी उशिरा आलो कि माझ्यावर ओरडणं...!! पण माझ्या एका sorry मुळे, तूझा तो राग "स्मित हास्यात" विरून जाणं...!! आजही ते हसू माझ्या आठवणीत आहे, तू माझ्या जवळ नाहीस हे दु:ख मला छळत आहे...!! ° खरंच, हे मन आज एकांतात खुप रडत आहे, तू माझ्या जवळ नाहीस हे दु:ख मला छळत आहे...!! •••°••

0 likes 0 shares
WhatsApp