Back to feed
R
Rohan Pawar Love · Marathi · Missing

तिचा मी कधीचं नव्हतो काल ही नव्हतो अन् आजही नाही पण माझी ती काल ही होती अन् आजही आहे... फरक फक्त ऐवढाचं आहे आता काल ती आयुष्यात अन् डोळ्यासमोर होती आणी आता ती फक्त आठवणीत आहे पण मी तिचा कधीचं नव्हतो काल ही नव्हतो अन् आजही नाही... कालही माझं प्रेम एकतर्फीचं होत अन् आजही माझं प्रेम एकतर्फीचं आहे प्रेम प्रेम असतं अस मला वाटतं आणी ते निस्वार्थी मनाने आपण ते करत रहायचं असं मला वाटत पण मी तिचा कधीचं नव्हतो कालही नव्हतो अन् आजही नाही... तिच्या जवळ असून सुद्धा ती माझ्या जवळ कधीचं नव्हती ह्रदयात तिच्या दुसरचं कुणीतरी होतं सांगायचं ना गं मला तु की तुझा मी कधीचं नव्हतो कालही नव्हतो अन् आजही नाही...

0 likes 0 shares
WhatsApp