Back to feed
A
Aditya Gupta Patriotic · Marathi · Patriotic

*ताज हॉटेल जळत होते.* *लाल रक्त गळत होते.* *खरे देश भक्त साळसकर होते.* *तेव्हा शासन आळसकर होते.* *पुन्हा सव्वीस अकरा नको.* *कसाब सारखा कसाई नको.* *नापाक पाकडे भामटे चाल करुण आले होते.* *तेव्हा शर्थीने लढणारे कामटे होते.* *तुकारामाने कमाल केली होती.* *कसाब पकडून धमाल केली होती.* *शत्रुशी लढता लढता तुम्ही शहीद झाले.* *तेव्हा या देशात किती वीर आहे हे आम्हाला माहित झाले.* *नागरे पाटलांचा विश्वास होता.* *ताज हॉटेलचा अभ्यास होता.* *आत शिरून पाकी आतंकी मारले.* *ओलीस धरलेले नागरिक तारले.* *नमन त्यांच्या कार्याला आहे.* *सलाम त्यांच्या शौर्याला आहे.* *२६/११ मधील सर्व शहीदांना* *भावपूर्ण श्रद्धांजली.....* 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐🙏

144 likes 44 shares
WhatsApp