Back to feed
K
Kabir Joshi Life · Marathi · Life

तूझी सावली शिशिर ऋतूच्या आघातामूऴे जमिनीला व्यापलेल्या पानापाचोळ्यातूनअचानक प्रगटते आहे तूझी हिरवीकंच पर्णसावली काळ्याशार ढगांनी झाकोऴलेल्या आभाळाला मध्येच तडा देवून अवचीत तऴपते तूझी प्रखर रवीचंदेरी सावली बरबट चिखलाने तुडूंब भरलेल्या तऴमद्धयातून क्षणात उमलते तूझी रक्त वर्ण कमळसावली नितऴ कायेला चिरणारया बोचरया थंडीला वाकूल्या दाखवत मला कवटाऴते आहे तूझी उबदार गुलाबसावली वारंवार उसऴणारया संकटांच्या उग्र वादऴलाटांतून वाट काढणारया जीवननौकेला सतत दिशा दाखवते आहे तूझीच श्वेत दीपस्तंभ सावली भकास पसरलेल्या निरस आयूष्याच्या रंगहीन मन:पटलावर अचानक रेखाटत आहे तूझी नीलवर्णी शब्द सावली सुखाची वाट पाहून थकलेल्या रडून रडून अश्रूडोह ही आटलेल्या निस्तेज नयनांसमोर आत्ता कुठे प्रगटत आहे दूर क्षितीजावर तूझी सप्तरंगीत सावली. तूझीच फक्त तूझी च सावली

140 likes 86 shares
WhatsApp