Back to feed
A
Ayaan Chauhan Life · Marathi · Life

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल दिस जातील, दिस येतील भोग सरंल, सुख येईल अवकळा समदी जाईल निघूनी तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी मिळंल का त्याला, उन वारा पानी राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी रोप आपुलच पर होईल येगळं दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल उडूनिया जाईल ही आसवांची रात अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं इवल्याशा पणतीचा इवलासा जीव त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव गीतकार : सुधीर मोघे संगीतकार : सुधीर फडके गायक : आशा भोसले , सुरेश वाडकर चित्रपट : शापित ( १९८२ )

253 likes 32 shares
WhatsApp