Back to feed
V
Vihaan Deshmukh Friendship · Marathi · Friendship

तुझ्यातला तु शोधू नकोस अर्थ नसलेला शाप ही भोगू नकोस निर्मळ असलेली मैत्री ही गैर असते प्रेमाच तर दुरदुर पर्यंत विचारु नकोस गुंता न बांधलेल्या रेशिम गाठीचा अडकतय मन तर सोडू नकोस हा शाप आहे तुझा नि माझा व्यर्थ कूणासही आरोप करु नकोस चुकल्यास साथ नसते कुणाची सुधारणार कोण अस म्हणु नकोस अदृश्य आहे शक्ती मागे तिला तु आशिर्वाद मानू नकोस रात्र असली म्हणुन काय चमकेल तारा पुर्वेस ही तु विसरु नकोस

253 likes 13 shares
WhatsApp