Back to feed
S
Sara Singh Love · Marathi · Rain

तृणपात्यावर दवबिंदूंची मैहफिल जमली होती| मला पाहता नजर चोरुनी, ती अलगत हसली होती| गालांवरती तिच्या रक्तिमा अवखळ सांडत होत्या| तिची ताजगी बघतांना तृणपाती लवली होती| श्रावणमासी प्राजक्ताचा सडा अंगणी होता| खुप बोलक्या डोळ्यांची पण नजर अबोली होती| शब्दांनेही तिला स्पर्शता, व्रण गाली पडले होते| मोरपिसांहून क्वचित जरा ती, अजून मखमली होती|

0 likes 0 shares
WhatsApp