*।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।।* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं,मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं,चिन्तामणि स्थेवरं || लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं,विघ्नेश्वरम् ओज़रम् | ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः,कुर्यात् सदा मङ्गलं || १ || 〰〰 गंगा सिंधु सरस्वती च यमुना,गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी,ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता,कुर्यातसदा मंगलम ।। २ ।। 〰〰 लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो,रंभादिदेवांगनाः ।। अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं,शंखोमृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम,कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।। 〰〰 राजा भीमक रुख्मिणीस नयनी,देखोनी चिंता करी । ही कन्या सगुणा वरा नृपवरा,कवणासि म्यां देईजे ।। आतां एक विचार कृष्ण नवरा,त्यासी समर्पू म्हणे । रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे,कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।। 〰〰 लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे,अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजातक सुधा,देवेंद्र हे आवरी ।। दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा,उच्चैःश्रवा भास्करा । धेनुवैद्य वधू वराशि चवदा,कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।। 〰〰 लाभो संतति संपदा बहु तुम्हां,लाभोतही सद्गुण । साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या,व्हा बांधवां भूषण ।। सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल । गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।। 〰〰 विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी । सिंधूला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।। रामासी जनकात्मजा प्रिय जशी,सावित्री सत्यव्रता । तैशी ही वधू साजिरी वरितसे,हर्षे वरासी आतां ।। ७।। 〰〰 आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा । गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।। दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी । वाजंत्रे बहु गलबला न करणे,लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।। 〰〰〰〰〰
88 likes
75 shares