Back to feed
A
Avni Das Life · Marathi · Life

_*थोडे हंसून घ्या, वाचा आणि विचार करा*_ *आयुष्याची वाटणी* 💎💎💎 _या जगाची निर्मिती करतांना परमेश्वराने आधी गाय🐄 आणी बैल 🐮बनवले आणि त्यांना सांगितले, “तुम्ही जन्मभर उन्हातान्हात कष्ट करून मानवांची सेवा करा. तुम्हाला मी साठ वर्षांचे आयुष्य देतो.”_ *त्यावर ते म्हणाले, “नको, आम्हाला वीस वर्षे पुरेत. चाळीस वर्षे परत घ्या.”* त्यानंतर परमेश्वराने कुत्र्याला🐕 बनवले आणि सांगितले, “तू मानवांच्या दारात बसून भुंकत रहा. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.” _त्यानंतर परमेश्वराने माकडाला🐒 बनवले आणि सांगितले, “तू उड्या मारून मानवांची करमणूक कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.”_ *त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.”* *_अखेर परमेश्वराने माणसाला👫 बनवले आणि सांगितले, “तू झोपा काढून, खेळून आणि खाऊन पिऊन मजा कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.”_* *त्यावर तो म्हणाला, “हे काय, मला फक्त वीस वर्षे ?(🐄,🐮,🐕,🐒)या इतर प्राण्यांनी परत केलेली वर्षे पण मला द्या.”* _*परमेश्वर म्हणाला,”तथास्तु.”*_ ✋🏻... ✋🏻... _म्हणूनच देवाने दिलेली पहिली वीस वर्षे माणूस मजेत💃🏼🏂🎭 घालवतो,_ *त्यानंतर चाळीस वर्षे बैलासारखे 🐮काबाडकष्ट करून घरसंसार चालवतो,* _त्यानंतर दहा वर्षे माकडा🐒 सारखे नातवंडांचे मनोरंजन करतो_ *_आणि अखेरची दहा वर्षे कुत्र्यासारखा 🐕...🐶बसून राहतो...._* 🌺🌺🌼🍃🌷🍃🌼🌺🌺 💐💐💐💐💐💐💐 💐💐 *एक कटूसत्य.....................!!!* ~ Sv ~

6 likes 75 shares
WhatsApp