थोड्याच दिवसात कळेल - भरपूर सुख मिळेल का तोंडचं पाणी पळेल ? जळी स्थळी काष्ठी पाषाणी " जुने बंडलं " दिसायलेत मेलो मेलो करीत लोकं दचकू दचकू उठायलेत सोनं नको नाणं नको नको बँकेत लॉकर झाड झुड करू म्हणतेत कशाला नौकर चाकर ? कुरियर वाला आला तरी I T वालाच वाटायलाय कडाक्याच्या थंडी मधे दरदरून घाम सुटायलाय भाई और बहणो म्हणलं की घरातच लोकं टरकायलेत " शनी महात्म "हातात धरून मारुती स्तोत्र म्हणायलेत Cash Less खिसे झाल्यामुळं माणसं बसतेत घरी आता म्हणतेत Non Veg पेक्षा पिठलं भाकरीच बरी स्वतःला Talented समजणारे रात्रीतून झाले बुश बाकी काही असो का नसो Common Man खुश कागदाचेच तुकडे " ते " हवेत गेले उडून कधी न बोलणारे सुद्धा रडले गळ्यात पडून शक्य आहे आता साऱ्या भानगडी बंद होतील हळूहळू देशातून काळे पैसे जातील इथून पुढे कुणीच आता टेंशन मधे नसणार मोकळ्या चाकळ्या गप्पा मारून खळखळून हासणार बी. पी. आणि शुगरचे पेशंट होतील कमी गावाकडे जात राहतील मन्या आणि सुमी तकतक कमी करून माणसं ओट्यावर निवांत बसतील ताण तणाव गेल्यामुळं पहिल्या सारखं हासतील नेमकं काय होईल ते थोड्याच दिवसात कळेल भरपूर सुख मिळेल का तोंडचं पाणी पळेल ? विसरू म्हणता विसरणार नाहीत November दोन हजार सोळा राष्ट्राला उद्देश्युन भाषण म्हणलं की पोटात यायलाय गोळा
82 likes
63 shares