Back to feed
A
Anika Singh Life · Marathi · Life

थोडंसं माय लेकिंसाठि काहीतरी...... सुनिता पिंप्रीकर यांची ही कविता: दुधात साखर विरघळावी तसं कुटुंबात आपलं स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकणा-या पिढीतली माझी आई. कष्ट आणि काटकसर करत शांत अन समाधानी राहण्याची किमया साधणारी! बालपणी आई सर्वस्व वाटली. माझ तान्हेपण तिच्या संरक्षक ओटीत ठेवलेली मायेच्या ऊबेने वेढलेली. पुढे शाळेत पाऊल पडलं तिचं बोट सोडताना काळीज भित्र्या सशागत झालं. हळूहळू शाळा आवडली तिथली छोटी छोटी गोष्ट आईला सांगाविशी वाटली. पुढचं पाऊल वरच्या वर्गात माझं क्षितिज विस्तारत होतं आता मात्र आईसाठी काही कवाडं बंद झाली, तिच्या परिस मैत्रिण अधिक जवळची वाटू लागली. वाढत्या वयाच्या उबंरठयावर आई खरं तर शत्रूच झाली. तिच्या एकेक बंधनांनी, तिच्या डोळ्यातल्या काळजीने मनात बंडखोरी दाटून आली. आणि आई तेव्हा अगदीच Orthodox वाटली. पुढे करिअर च्या वाटेवर आई माझी पाठराखीण झाली, Time Management चे धडे शिकवताना आई माझी councillor झाली. लग्न झालं संसारातल्या जबाबदा-या नातीगोती सांभाळताना आई खूपच Great वाटली. सौंदर्य, सुजाणपण, सहकार्य सामंजस्य, सहनशक्ति, समर्पण या शब्दांचे अर्थ प्रत्यक्ष जगणारी आई, मला dictionary वाटली. मग आई होण्याची माझी वेळ आली तिच्या हातच्या चवीसाठी मनात आस दाटून आली. पावलोपावली जपणा-या तिच्या डोळ्यातली काळजी आता हवीहवीशी वाटली. हातात माझ्या माझी छकुली. माझ्या गर्भात वाढलेली. जणु माझीच दुसरी सावली आईची मात्र लाडकी नातुली. तिचं खाणपिणं, तिची आजारपणं तिच चालणं, तिच बोलणं, वेळी अवेळी सल्ला मागताना आई family Doctor झाली. वयाच्या नाजुक वळणावर माझी सोनुली उभी राहिली. आईच्या डोळ्यातली काळजी आता माझ्याही मनात उतरली. माझ्या लेकीवरती मी मग मैत्रीची शाल पांघरली. तीही मग विश्वासाने सगळं काही बोलू लागली. आणि मग एक दिवस अलगद गळ्यात पडून चक्क मला ती I love you म्हणाली. तिच्या शब्दांनी सुखावलेली माझ्यातली मुलगी मात्र एकदम गलबलली. आणि मीच स्वत:ला विचारलं, अग, तुझ्या पेक्षा कांकणभर सरस असं आईपण निभावलेल्या तुझ्या स्वतःच्या आईला अशी पावती तुला कधीच का द्यावीशी नाही वाटली Nice.heart touching.💑

201 likes 76 shares
WhatsApp