Back to feed
A
Arjun Gupta Love · Marathi · Motivation

दे प्रकाश मला असा दे प्रकाश मला असा चंद्र हरवून जावा चांदणं झूरावं मनी मुक्त उडावा काजवा दे प्रकाश मला असा दुःख विसरून जावे पंख जरी थकलेले स्वप्नात उडून यावे दे प्रकाश मला असा गुंता शब्दात सुटावा कळी फुलावी कळोखी रात्री उजेड दाटावा दे प्रकाश मला असा स्मीत नजरेत द्यावे उमेद उद्याची सारी अन् शब्द आज गावे

0 likes 0 shares
WhatsApp