✒ दु:ख कधीच वाटलं नाही ✒ . दु:ख याचं कधीच नव्हतं, परक्यांनी खुप वेळा झिडकारलं, टोचणी याची आजही लागली की, नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं ! दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की, इतरांनी खुप वेळा निंदा केली, कंत इतकीच कुठेतरी सलत राहिली की, घरच्यांनीच आपली खुप शोभा केली...! दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की, अनेक वेळा माझा विश्वासघात केला, दु:ख फक्क्त याचं वाटलं की, कुणीतरी आपल्यानेच विश्वासघातकी ठरवला..! दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की, मजवर कोणी विश्वास नाही केला सल फक्त एवढीच कुठेतरी राहिली की, सगळ्यांनीच मजसाठी विषाचा पेला तयार केला..! दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,, आयुष्यात कधी दिवाळी आली नाही, खंत एकच मनात कुठेतरी दडली की, जवळच्यांनीच माझ्या आयुष्याची होळी पेटवली..! दु:ख याचं कधीच वाटलं नाही की, कुणी माझे गुण नाही पारखले, सल मनात एकच कुढू लागली की, जवळच्यांनीच माझ्यात खुप दोष बघितले..! दु:ख याचं कधीच वाटलं नाही की, कधी कुणी माझ्यावर प्रेम नाही केले, टोचणी फक्त एकच लागुन राहिली की, का फक्त माझ्यासाठीच तिरस्काराचे पेले..! दु:ख याचं कधीच वाटलं नाही की, एका जीवंत माणसाचे रुपांतर प्रेतात झाले, टोचणी फक्त एवढीच लागुन राहिली की, एका महान आत्म्याचे भुतात रुपांतर झाले...
214 likes
57 shares