Back to feed
A
Ayaan Iyer Life · Marathi · Life

देवा ! ********************** घे कधी माझ्या मनाचा ठाव देवा केवढा देतो तुला मी भाव देवा चालला माणूस आहे बघ कुठे तू चाप त्याच्या वागण्याला लाव देवा लागुनीया ठेस जे नाही सुधारत काळजावर घाल मोठा घाव देवा दाखल्यावर जात नाही ज्या विचारत घाल त्या शाळेत माझे नाव देवा सोडुनी शहरात होते धावलेले माय येथे एकटी अन् गाव देवा जो दलालांनी मिळूनी लाटलेला दे श्रमाला मिळवुनी तो भाव देवा ठेवुनी कर्मांवरी विश्वास जे जे मार्ग त्यांना तू सुखाचा दाव देवा मागतो आहे जगासाठी सुखांना एकदा माझ्याचसाठी पाव देवा ********************

250 likes 34 shares
WhatsApp