Back to feed
V
Vivaan Singh Life · Marathi · Life

देवा कुठेही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं... देवा कुठेही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं | एवढे मागणे मान्य कर पण जगालाचं तु सुखी ठेवं || देवा कुठेही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं..... सर्वांना चांगली बुद्धी दे मागणे माझे लई नाही | एवढेच मागणे माझे तुला परंतु सर्वावर तु लक्ष ठेवं || देवा कुठे ही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं.... विनंती करीतो देवा तुला असचं तुं जगाचं रक्षण करं | विसरणार नाही आयुष्य भर मी देवा करीन मी भक्ती भावं || देवा कुठे ही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं........ तुच पाठी राखा आमुचा आणि तुच पालन कर्ता | तुच आहेस विघ्न हर्ता देवा, स्वप्नात येऊन एकदा तरी मज दर्शन द्यावं || देवा कुठे ही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं...... लय वाईट वाटतय बघतांना लोक व्यसना आहारी जातांना | जात असतील तर तु देवा त्यांना क्षणातच मागे फिरवं || देवा कुठे ही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं...... तुझी भक्ती तुझी पुजा माझ्या कडुन मनापासुन करुन घे | आणि पसरलेल्या सर्व रोगराईला तु पुर्ण पणेच घालवं || देवा कुठे ही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं...... देवा जीथे आहे मानव तिथे तिथे त्याला तु सुखी ठेवं | येणाऱ्या प्रत्येक संकटा समई तु मानवाच्या मागे धावं || देवा कुठे ही असु दे पण तु सर्वांनाच सुखी ठेवं...... सर्वांना सुखी ठेवं............ देवा सर्वांना तु सुखी ठेवं....

80 likes 18 shares
WhatsApp