Back to feed
S
Shaurya Kapoor Life · Marathi · Life

"देवा...पैशाचा पाऊस कधी पाडणार...एकदातरी...आमची इच्छा पूरी कर कारण आमच्यासाठी ...कोणिही पैशाची मदत करत नाही..फक्त आश्वासने देतात...देवा आम्हा गरीबांसाठी ...मोठा पैशाचा पाऊस पाड.. आमची स्वप्ने पूरी कर . " सर्वांची प्रार्थना एकून...देव तयार होतो .... व त्यांना सांगतो.....मी फक्त तुमच्या गावातच उदया सकाळी 6 वा एक मोठा ढग घेऊन येतो..." एकजण मध्येच ओरडतो.देवा...काळा ढग नको आणू.....नाहीतर काळा पैसा पडेल .... देव हसत म्हणतो " मी तर सफेद ढग आणणार...व तुमच्यासाठी.... फक्त 5 मिनट पैशाचा पाऊस पाडणार....प्रत्येकाने न भांडता गोळा करा...आणि जर का भांडण केली तर मात्र ..मी माझ्या मनासारख करणार....व .हे कोणालाही सांगू नका " देव गायब होताच ...गावातले सर्व गरीब नाचू लागतात...व घरी जाऊन तयारीला लागतात...त्यांच्या बायकांना ही गोष्ट कळताच.. ही बातमी .....हळुहळु श्रीमंत बायकांच्या कानावर जाते... मग काय होणार ...पैशाची हाव कोणाची कमी होते का ... गरीब न झोपता सकाळची वाट बघतात ...पैसे गोळा करण्यासाठी जोतो घरातली भांडी बाहेर काढतो...कोणी चादर आणतात..तर काही झाडावर ..तर काही घरावर जाऊन बसतात.... एकदाचे 6 वाजतात....सर्वजण आकाशाकडे बघतात...देवाने ......... सांगितल्याप्रमाणे एक मोठा सफेद ढग गावाच्या दिशेने येऊ लागतो सर्व गरीब लोक तयारीत राहतात....पैशाच्या पावसाला सुरवात होताच....आकाशात चार हेलीकाॅप्टर ...मोठा पडदा घेऊन...बरोबर ढगाच्या खाली येऊन सर्व पैसा गोळा करतात....खाली गरीबांना शेवटी एकही पैसा भेटत नाही....गरीब बिचारे... थोडयावेळाने ढग व हेलिकाॅप्टर अचानक गायब होतात..... गरीब लोक ...आपल्या नशिबावर रडू लागताच... ..देव तेथे येऊन समजावतो.....पाहिलत ..मी पहिलांदा तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडला....पण तुम्हाला उपयोग नाही झाला..तुमचा सर्व पैसा....त्या श्रीमंतांनी हेलिकाॅप्टर पाठवून पळवत होते ...पण...तो त्यांनाही.. मिळाला नाही....कारण एवढा पैसा बघून...हेलिकाॅप्टरवाले...पैसा घेऊन पळताच....सर्वजण समुद्रात पडून बुडाले........ ..म्हणून . मी सांगतो...नशिबात जेवढा पैसा आहे.. तेवढाच मिळणार. मेहनत करा...कष्टाचा पैसा हाच खरा पैसा....त्याच सुख मोठ असते कमी जरी असला तरी सुखाची झोप लागते...पण..... सर्वजण विचारतात.....देवा...पण काय ? देव म्हणतो " कधीही काळया पैशाचा मागे लागू नका...कारण मेहनतीचा पैसा जेवढा टिकतो...तेवढा काळा पैसा टिकत नाही.. .अचानक नष्ट होतो....आणि हे लक्षात ठेवा... पैशाच्या पावसाचे स्वप्न हयापुढे पाहू नका ....पण पैशापायी ख-या ....पावसाला विसरू नका....कारण...पैसा कितिही असला तरी ....वेळ पडली की नाही खाऊ शकत...नाही पिऊ शकत... शेवटी ......पैसा पेक्षा ....खरा पाऊसच ...मोठा आहे..."

174 likes 71 shares
WhatsApp