Back to feed
S
Sahil Sharma Life · Marathi · Life

।। दास-वाणी ।। ऐका प्रळयाचें लक्षण । पिंडी दोनी प्रळये जाण । येकनिद्रा येक मरण । देहांतकाळ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १०/०५/०१ प्रलय म्हणजे जागृतीचा विलय. प्रलय म्हणजे यच्चयावत दृष्य पदार्थांचा विनाश. पिंड म्हणजे विशिष्ट अणूरेणू किंवा पेशीसमूहाच्या संरचनेतून तयार झालेली दृष्य चैतन्यमयी आकृती. प्रलयाची लक्षणे आता ऐका. शरीराला किंवा देहाला दोन प्रकारचे प्रलय असतात. पहिला निद्रा प्रलय म्हणजे गाढ झोप ज्यामधे जागृतीचा विलय होतो परंतु तात्पुरताच. जाग आली की चैतन्य पुन्हा कार्यान्वित होते. दुसरा देहांत प्रलय. आयुष्य भोगून संपल्यावर देहाला किंवा पिंडाला मरण येते ते कायमचेच.त्याचबरोबर चैतन्यही संपुष्टात येते. पुढे तो देहही नष्ट होतो. पंचप्रळयनिरूपण समास.

41 likes 75 shares
WhatsApp