Back to feed
K
Krishna Yadav Life · Marathi · Life

धोनीच्या सिनेमातील या 5 गोष्टी आहेत खोट्या मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 80 कोटीहून अधिक गल्ला जमवलाय. सर्वत्र या सिनेमाची चर्चा सुरु आहे. मात्र सिनेमात असे काही प्रसंग दाखवलेयत ते धोनीच्या रियल लाईफमध्ये घडलेच नव्हते. 1. सिनेमात दाखवलंय की जेव्हा साक्षी आणि धोनीची पहिली भेट होते तेव्हा तिला धोनी कोण आहे हे माहीत नसतं. मात्र रियल लाईफमध्ये जेव्हा त्यांची भेट झाली होती तेव्हा साक्षी धोनीची फॅन होती. 2. धोनीच्या सिनेमात केवळ त्याची बहीण दाखवण्यात आलीये. मात्र धोनीचा मोठा भाऊही आहे. त्याचा मात्र सिनेमात उल्लेख नाही. 3. सिनेमात जेव्हा धोनीच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूची बातमी ऐकून तो रस्त्यावर रडायला लागतो. मात्र खरतर असं काही घडलं नव्हतं. त्यावेळी धोनी खूप मोठा स्टार होता आणि इतका मोठा स्टार रस्त्यावर एकटा असणे आणि भररस्त्यात रडणे शक्य नाही. 4. संपूर्ण सिनेमात धोनीचे एकच घर दाखवण्यात आले. मात्र रिअल लाईफमध्ये धोनी जेव्हा स्टार झाला तेव्हा त्याने रांचीमध्ये आलिशान घर घेतले. 5. सिनेमात धोनी लग्नानंतर लगेच हनिमूनला जातो असे दाखवलेय. मात्र रियल लाईफमध्ये धोनीला लग्नानंतर अजिबात वेळ नव्हता. तब्बल 6 महिन्यांनी धोनी हनिमूनला गेला.

46 likes 46 shares
WhatsApp