"नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे अनेक आतंकवादी मारले गेले आहेत आणि याचा संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे. तरीही आपल्याच देशातील काही नालायक व्यक्तींना आपल्या जवानांनी केलेल्या या धाडशी कृत्यावर खऱ्या खोट्याचा संशय आहे , अशा महाशयांना देशद्रोही ठरवावे का असा प्रश्न मनात येतो . देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांवर जेव्हा कोण बोट उगारतो त्यावेळी मात्र मनात संताप उसळतो आणि प्रत्येक कवीची लेखणी बोलू लागते... " स्वतंत्र भारत. जिंकुन हरल्याची कुजबूज होत आहे हैवान माणसांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे प्रेम नाही ज्याच्या उरी त्या सैनिकांसाठी, अशी दृष्ट व्यक्ती साली देशद्रोही आहे... संकट समयाला होऊ एक सारे हवे कशास तेव्हा भेदभाव बा रे नको राजकारण या देश हितासाठी, आपण भांडलो तर देश हरणार आहे... स्वतंत्र भारतात व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून का कसेही कुणी वागायाचे आहे लढून शहीद होती सैनिक देशासाठी, तो शौर्यवीर अपुला राम रहीम ख्रिस्त आहे... देशाची एकी देते सैनिकांना बळ आनंदाने ते लढती बनुनिया काळ त्यागुनी सुख सारे घरदार देशासाठी, लढती म्हणूनिया रे भारत स्वतंत्र आहे...
24 likes
34 shares