A
Ayaan Yadav
Love · Marathi · Friendship
नकळत तुझं मित्रत्व मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं माझ्या भावनांचं विश्व तेव्हाच विस्तारलं होतं / तुला रोज बघणं आयुष्यातली एक सवय बनत गेली तुझ्या फोनची वाट पाहण्यात संध्याकाळ माझी विरत गेली / तू समोर आल्यावर शब्द सारेच पळून जायचे तू गेल्यावर मग मात्र काय काय सांगायचं होतं याची आठवण करून द्यायचे / तुझ्या पहिल्याच हास्यात मी पूर्णपणे डूबायचो आणि आपल्या मैत्रीच्या वेलीला आणखीनच जपायचो
0 likes
0 shares