Back to feed
A
Anika Malhotra Friendship · Marathi · Friendship

नोटसम्राट... कोणी सुट्टे देत का हो?... सुट्टे..? एका हजार-पाचशेच्या नोटेचे कोणी सुट्टे देत का? एक हजार-पाचशेची नोट, सुट्यावाचून, ATM वाचून, मोदीच्या मायेवाचुन, सरकारी दये पासून,   रस्त्यारस्त्यावर, तिजारीच्या बाहेर पडून वणवण हिंडत आहे... जेथुन कोणी ते बदलून देईल अशी जागा शोधत आहे... गव्हर्नरा, तू इतका कठोर का झालास, एका बाजूला ज्यांना आम्ही साथ दिली ते आंम्हाला लपवतात... आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला छापल होत, तो तूही आंम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या, चुरगळलेल्या या कागदांना घेवून हे सरकारी नोकरा, आम्ही जीर्ण नोटांनी कोणाच्या पायावर जावुन फाटायच रे? कोणी सुट्टे देत का सुट्टे...? एका हजार पाचशेचे सुट्टे...

26 likes 6 shares
WhatsApp