Back to feed
A
Aarav Das Patriotic · Marathi · Patriotic

*नोटसम्राट चिमटा* *कुणी शंभर देता का शंभर..!* हजार व पाचशेच्या ओझ्याने जड झालेल्या ह्या नंबर दोनवाल्याला कोणी शंभर देता का शंभर.. .? सरकार... सरकार काय करून ठेवलंस हे ? हजार पाचशेच्या गड्ड्या असूनही कफल्लक झालेल्या या भ्रष्टसम्राटाला कुणी शंभर देता का ? काय करांव या गड्ड्यांना काही समजत नाही.. जाळून टाकांवं का फेकून द्यावं हे हजारांचा बंडलांच लक्तर उकिरड्यावर... फेकावे, जाळावें का जमा करावेत.. To be or not to be हा एकच सवाल आहे. का फुकटचे शुक्लकाष्ट लावून घ्यावे मागे आय् टी वाल्यांचे..? अच्छे दिन येतील म्हणून निवडून दिलेल्या मोदेश्वरा... ज्यांच्या साठी हे जमा केले तेही आता फिरकून पहांत नाहीत आणि गड्ड्या सोबत असल्यानेबी झोपही लागत नाही... अश्या असाह्य परिस्थितीत आम्ही श्रीमंत भिका-यांने कुठे जांवं हे तूच सांग रे मोदिश्वरा...।

55 likes 16 shares
WhatsApp